कासेगाव सारखया विविधतेने नटलेल्या व विविध परंपरा अभिमानाने जोपासणाऱ्या गावामध्ये गावातील नागरिकांची वाचनाची आवड जपणारे ग्रंथालय असायला हवे त्यासाठी गावचे जेष्ठ सुपुत्र मा. श्री. संभाजीराव जनार्धन वाडकर यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्या निमित्त त्यांनी गावामध्ये #मा_श्री_संभाजीराव_ज_वाडकर_सार्व_वाचनालय असे ग्रंथालय उभारण्याचा निर्णय घेतला व त्यातूनच हे ग्रंथालय आकारास आले.
गावामध्ये हे #सार्वजनिक_वाचनालय सुरु करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खाजगी वाचनालयातील शेकडो पुस्तके याकामी संस्थेला दिली व ग्रंथालय आकारास आले. या संस्थेच्या उभारणीकामी अनेकांनी पुढाकार घेतला व या संस्थेच्या उभारणीमध्ये महत्वाची भूमिका बजावली असे कासेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मा.श्री.भरत जाधव, सत्यपाल वाडकर, अजित जाधव, महादेव माळी, गणेश वाडकर,राजाभाऊ वाडकर, जालिंदर गायकवाड, अशा अनेकांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे व त्याचेच हे फळ आपण आज भव्य ग्रंथालयाच्या स्वरूपात पाहत आहोत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा